पंतप्रधान मोदींनी घेतली क्रिस्टियानो अमोन भेट; नवीन व्यापारी संधी शोधणार-बैठकीत एकमत

 

 

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली होती. अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांची भेट घेत डिजिटल इंडियाला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.

 

या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डिजिटल इंडिया’ची माहिती देत नव्या गुंतवणूक प्रस्तावांचं स्वागत केलं. काय म्हणाले अमोन भारत ही जगातील सर्वोत्तम बाजारपेठ असून भविष्यात भारताला मोठ्या संधी असल्याचं Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी म्हटलं आहे. भारतासोबत काम करण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असल्याचं त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

 

 

भारत ही एक सर्वोत्तम बाजारपेठ आहेच, मात्र त्याचवेळी एक सक्षम निर्यातदार देश हीदेखील भारताची ओळख असल्याचं त्यांनी म्हटलं. भारताची अनेक क्षेत्रात निर्यात करण्याची क्षमता अफाट असून त्यामुळे भारताचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.भारतानं देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन उत्पादन तर करावंच, मात्र त्याचसोबत इतर देशांच्या गरजा भागवण्याचंही काम करावं, असा सल्ला त्यांनी दिला. एकत्र काम करण्याचा प्रस्ताव भारतासोबत सेमी-कंडक्टरच्या क्षेत्रात एकत्र काम करायला आवडेल, असा प्रस्ताव त्यांनी दिला.

Team Global News Marathi: