मेहबूब शेख प्रकरणी राजेश टोपेंकडून राष्ट्रवादीची सरळ आणि थेट भूमिका स्पष्ट |

 

मेहबूब शेख यांच्यावर काही महिण्यापुर्वी एका उच्च शिक्षित महिलेने थेट लैगिक अत्याचार केल्याचा आरोप लगावला होता. याच मुद्द्यावरून भाजपा महिला नेत्या चित्राला वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटले होते. त्यातच आता कोर्टाने मेहबूब शेख यांना जोरदार धक्का दिला आहे. सध्या मेहबूब शेख हे कोर्टाच्या आदेशानंतर काहीसे अडचणीत आले आहेत.

 

बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच या प्रकरणी पुन्हा काही मुद्द्यांवर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश देताना न्यायालयाने पोलिसानांही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. कोर्टाने बी समरी रिपोर्ट फेटाळल्यानंतर मेहबूब शेख यांच्यासमोरील तसंच राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढणार आहेत. कारण याच मुद्द्यावरुन भाजप आता आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याआधीच राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मेहबूब शेख प्रकरणावर भाष्य केलंय. राष्ट्रवादीची या प्रकरणी भूमिका स्पष्ट करताना न्यायालयीन प्रक्रिया असल्याने यावर बोलणं ठीक नसल्याचं सांगत कोर्टाला आणि पोलिसांना मेहबूब शेख सहकार्य करतील, असं सांगितलं आहे.

तसेच मेहबूब शेख यांचं प्रकरण हे न्यायिक प्रकरण आहे. त्यामध्ये आताच बोलणं किंवा कुठलीही कमेंट करणं योग्य नाही. न्यायिक प्रक्रिया ही त्याच्या त्यांच्या पद्धतीने चालते. त्यामध्ये हस्तक्षेप करणं आणि बोलणं योग्य नाही. ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्या प्रक्रियेला मेहबूब शेख यांच्याकडून सहकार्य केले जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Team Global News Marathi: