शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रतिउत्तर

शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रतिउत्तर

दिल्लीत शेतकरी आंदोलनावरून आता राष्ट्रवादीचेच अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहावयास मिळत आहे. दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी नाहीतच, असा दावा करणाऱ्या दरेकरांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला. प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे, असं पवार म्हणाले. पवारांच्या टीकेला आता पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं, परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं”, असं दरेकर म्हणाले.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी करूच शकत नाही. शेतकरी असं आंदोलन पेटवूच शकत नाहीत. लोकांच्या पोटाची भूक भगावणारा शेतकरी आंदोलन पेटवण्याची भाषा करूच शकत नाही. आंदोलन पेटवूच शकत नाही. काही देशविघातक शक्ती या आंदोलनामागच्या बोलवित्या धनी आहेत, असा दावाही त्यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: