प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

 

रविवारी 6 नोव्हेंबर रोजी अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धादेखील या प्रयोगाला हजर होते.

12 हजार 500 प्रयोग प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, त्यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा यासाठीच आधीच केंद्र सरकारला पाठवला आहे.

यावेळी दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस स्पष्ट केले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी प्रशांत दामले यांचा मित्र म्हणून उल्लेख करत त्यांच्या यशस्वी कारकीर्तीचे तोंडभरून कौतुक केले

Team Global News Marathi: