प्रशांत किशोर तिसऱ्यांना शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण |

नवी दिल्ली | दोनच दिवसांपूर्वी राजकीय विश्लेषक प्रश्नत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रशांत किशोर हे शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेण्यसाठी पोहचले आहेत.

शरद पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेत असून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. दरम्यान प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले असून या भेटीमुळे पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात एकचं खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची त्यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वर भेट घेतली होती. यावेळी पवार व किशोर यांच्यात तब्बल साडेतीन तास चर्चा पार पडली होती. या भेटीदरम्यान मोदींविरोधातील जनतेच्या मनातील रोष, त्यातील निर्माण झालेली तिसऱ्या आघाडीची शक्यता यावर तेव्हा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे देशातील अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत खूप चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवारांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार भाजपा विरोधात तिसरी आघाडी स्थापन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Global News Marathi: