शुद्धीकरण करत २०० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांची तृणमूल पक्षात घरवापसी !

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या अनेक आजी-माजी नेत्यांनी ममता दीदींची साथ सोडून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीला भाजपच्या दिशेने उलटे वारे फिरून या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवून भाजपाला पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करताना दिसत आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यांनतर भाजपमधील २४ हुन अधिक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यातच आता २०० कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हुगळी जिल्यात कार्यकर्त्यांनी गंगाजलने शुद्धीकरण करत भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं म्हणत तृणमूलमध्ये प्रवेश घेतला आहे.

पक्षात प्रवेश करण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेत स्वःताच्या अंगावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाने विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे कार्यकर्ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये जात असल्याचा दावा केला आहे.

Team Global News Marathi: