प्रसाद लाडांनी नियमांचं उल्लंघन केलं, तर प्रसाद लाड म्हणतायत की,

 

मुंबई बँक संचालक मंडळातील सदस्यांच्या पात्रतेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करत बँकेचे संचालक झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तर, मी माझ्या कंपनीचा नोकरदार असल्याचे सांगत लाड यांनी स्वत:चा बचाव केला आहे. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षातचे धनंजय शिंदे यांनी मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर आरोप केले आहेत. बँकेतील संचालक मंडळ ही प्रवीण दरेकर यांची टोळी असून यामध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचारी म्हणून प्रसाद लाड निवडून येत आहेत. मात्र ते कर्मचारी नाहीत. सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन आहे.

यावर बोलताना लाड म्हणाले की, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘आप’चे आरोप फेटाळून लावले आहेत. मी माझ्या कंपनीचा नोकरदार आहे. मुकेश अंबानी उद्योगपती असले तरीही ते त्यांच्या कंपनीत ते नोकर आहेत अशी भूमिका प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. ‘आप’चे शिंदे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप लाड यांनी केला.

Team Global News Marathi: