सत्तासंघर्ष कायम! महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची दांडी

सत्तासंघर्ष कायम! महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची दांडी

सत्तासंघर्षाचा पेच कायम असताना आता येत्या २४ तासांत राज्यातील चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पुढे काय रणनीती आखायची याकरता महाविकास आघाडीची बैठक सिल्व्हर ओकवर बोलावण्यात आली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे नेते शेवटपर्यंत आले नसल्याची माहिती समोर आली आहे. (Shiv Sena leaders absent in the meeting of Mahavikas Aghadi leaders)

हेही वाचा : राज्यपालांकडून ‘करेक्ट कार्यक्रम’! ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा अटळ, राज्यपालांच्या पत्रातून कोणते आदेश दिलेत?

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारमध्ये सारंकारी आलबेल आहे असं आतापर्यंत भासवलं जात होतं. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आले. यामुळे राज्यातील सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे राज्यात आता राजकारणाचा कोणता अंक पाहायला मिळणार याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा :एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत पोहोचणार

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार, त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. तसेच, या बंडखोर आमदारांनी मविआचा पाठिंबा काढल्याचेही पत्रक दिले होते. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या (30 जूनला) सकाळी 11 ते 5 यावेळेत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणारे पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टसाठी बोलावल्यामुळे उद्धव गटानं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यामागे उद्धव गटाचा युक्तिवाद असा आहे की, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयानेच 11 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. अशा स्थितीत राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे,

हेही वाचा :आजचे राशीभविष्य, उत्तम आरोग्य, यश, कीर्ती, आनंदाची प्राप्ती होईल- वाचा सविस्तर-

अत्यंत अटीतटीचा पेच निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी १० वाजल्यापासून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अशोक चव्हाण या बैठकीला हजर राहिले होते. मात्र, या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यांनी दांडी का मारली याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारणात नेमकी कोणती नाट्यमय घडामोड होतेय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: