सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये”

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवारी खासदार छत्रपती संभाजीराजे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड शहरातील जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा असे सांगितले होते. त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने विचारला.

तरुणाच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले की, “जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा.” असे यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे यांच्या या विधानावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे कोर्टात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे असे युद्ध मुंडे यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: