पुण्याची सत्ता काबीज करण्यासाठी राज ठाकरे सोपवणार नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

पुणे : पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली असून कार्यकर्त्यांना यापूर्वीच तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. यासाठी पुणे शहराकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहराध्यक्ष पदी वसंत शिंदे यांची नियुक्ती केली होती

आता त्या पाठोपाठ पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली होती. या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधून विशेष मार्गदर्शन करणार आहे. येणाऱ्या शुक्रवारी राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल. तसेच येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने यावेळी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज ठाकरे आपल्या नव्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे येणाऱ्या शुक्रवारी समोर येईल.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बदल करण्यात आले होते. यामध्ये मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: