पोटनिवडणूक जाहीर पण चिन्हाचं काय ?

मुंबईतील अंधेरी येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ६ राज्यातील ७ जागेसाठी पोटनिवडणुका पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्यात शिवेसेनेसमोर पक्षचिन्ह आणि नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील ही पहिली निवडणूक आहे. त्यामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असून शिवसैनिकांकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गटासमोर पक्षचिन्हावरून पेच निर्माण झाला आहे.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असताना आता या निवडणुकांत शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला उमेदवार देता येईल का? दिले तर चिन्ह आणि पक्षाचं काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र यावर अद्याप शिवसेनेच्या एकही नेत्याने प्रतिक्रिया दिली नसून यावर कोणता मार्ग काढण्यात येणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: