राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अमित शाहांना भेटणार, खडसे यांचे सुचक विधान

 

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांना फक्त मी नाही तर शरद पवारही भेटणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मी अमित शहा यांच्या भेटीबाबत शरद पवारांना पूर्ण कल्पना दिली आहे.

शरद पवारही माझ्यासोबत भेटीला अमित शाह यांच्या भेटीला येणार आहेत, असं खडसे म्हणाले आहेत. रक्षाताईंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही, असं महाजन म्हणाले. याबाबत मी रक्षा खडसेंना विचारलं. महाजनांसोबत मी कुठलीही चर्चा केलेली नाही, असं रक्षा खडसेंनी सांगितल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

तसेच गिरीश महाजन यांना कुठल्याही मिटवण्याच्या विषयावर मी बोललो नाही, असं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलं आहे. नाशिकच्या सभेनंतरही मी त्यांच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार आहे. भेटीचे कारण राजकीय नाही. अन्य विषयांवर चर्चा मी त्यांच्याशी करणार आहे, असंही खडसेंनी सांगितलं.

Team Global News Marathi: