बदनामी थांबवा नाहीतर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यात या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर प्रसार माध्यमांवर पूजा चव्हाण हिच्या रोज नवीन नवीन बातम्या आणि फोटो शेअर केले जात होते. त्यामुळे कुतेरती तिच्या आत्महत्येनंतर तिची बदनामी होत असल्याचे मत तिच्या कुटुंबीयांनी मांडले होते.

तसेच पूजाच्या वडिलांनी सुद्धा होणारी बदनामी थांबवावी म्हणून विनंती केली होती अन्यथा आम्हाला सुद्धा आत्महत्या करावी लागेल असे त्यांनी माध्यमांवर बोलून दाखविले होते. आता त्यांच्या पाठोपाठ पूजाच्या बहिणीने सुद्धा भावनिक आव्हान केले आहे. सध्या सोशल मीडियावर पूजाच्या होणाऱ्या बदनामी वरून तिने संताप व्यक्त केला आहे.

पोस्टमध्ये ती म्हणाली आहे की, ”वृत्तमाध्यमे सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पूजाच्या पोस्ट आहेत. त्या का नाही कोणी व्हायरल करत? जर त्या पुरूष असत्या तर त्यांच्यासोबतही नाव जोडले असते. माध्यमे ही काहीही मनघडन, त्यांच्या आवडीनूसार, काहीपण कॅप्शन देऊन वाटेल ते पूजाच्या नावाने खोटी माहिती प्रसारित करण्यासाठीत आहेत. प्रसार माध्यमातून सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणे पूजाला कोणाकडून गिफ्ट मिळाले आहेत. आणि ते कथित व्यक्तिकडूनच भेटले असा दावाही वृत्तवाहिन्या करत आहेत.

हे असे दररोज काहीतरी नवीन ऐकूण माध्यमांवरून विश्वास उडाला आहे. कोणाचे दु:ख कमी करू शकत नसाल तर कृपया हात जोडून विनंती आहे की त्यात भर तरी टाकू नका. हा त्रास आता दिवसेंदिवस असहनीय होत आहे. पूजा सुद्धा कोणाची तरी लेक किंवा कोणाची तरी बहिण आहे. अशा प्रकारची बदनामी करत आहात तुम्ही. आम्ही सहन तरी कशी करणार? माझ्या आई-वडिलांना काही व्हावे असे तुमची इच्छा आहे का? अनेकदा सर्वांना विनंतरी करूनही आमची बदनामी करणे थांबवत नाहीयेत. या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत…” असे भावनिक आवाहन तिने केले आहे.

Team Global News Marathi: