पूजाचा चुलत भाऊ मंत्री संजय राठोड यांच्या मार्फत लागला वन खात्यात कामाला ?

सध्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अथक सुद्धा केली होती.

मात्र या प्रकारांत आता आणखी काही माहिती समोर येत आहे. पूजाचा चुलत भाऊ विलास चव्हाणही वनखात्यात नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार,विलास जानेवारीपासून पुण्यात वास्तव्यास होता.

विलास चव्हाण पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागात कामाला असल्याचे समोर आले आहे. तिथे तो शिपाई पदावर कार्यरत असून ८ फेब्रुवारीपासून कामावर गैरहजर असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे.

जानेवारीपासून तो तिथे नोकरीला असून त्याची थेट भरती करण्यात आलेली नाही. तो एका बाहेरील मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तिथे नोकरीला आहे. कार्यालयात त्याची वागणूक अत्यंत सामान्य होती, त्याच्याविषयी आम्हालाही बातम्यांमधूनच माहिती कळाल्याचे वनविभातील सूत्रांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: