मुंबई महानगर पालिकेची हॉटेल, पब आणि मंगल कार्यालयांना नोटीस

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. त्यामुळे मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. मुंबईत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे मनपा अधिक सतर्क झाली आहे.

त्यात मुंबई शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, पब, रेस्टॉरन्ट आणि मंगलकार्यालयांना महापालिकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे आता सर्व हॉटेल व्यावसायिकांना मनपाच्या कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

महानगरपालिका मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या पहाता अॅक्शन मोडवर आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने अंधेरी पश्चिमेतील ३२ हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयाना नोटीसा बजावल्या आहेत.

कोरोनाचे नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तसेच होणारी गर्दी टाळा, अशा सूचना महानगरपालिकेने या हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि मंगलकार्यालयांना केल्या आहेत.

Team Global News Marathi: