पोंक्षे, गोखले, कंगना यांना एक न्याय अन् किरण मानेंना वेगळा का? सोशल मीडियावर संताप

 

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेचे अभिनेते किरण माने यांना कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर किरण माने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. अभिनेता किरण मानेंना एक राजकीय पोस्ट नडली आणि त्यामुळेच त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

स्टार प्रवाहाने केलेल्या कारवाईनंतर अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोशल मीडियावर लोकांनी किरण मानेंना जाहिर पाठींबा देत #ISupportKiranMane ही मोहिम सुरू केली आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. कारण तुम्ही सर्वांच्या मनात आहात,’ अशा शब्दांत लोकांनी किरण मानेंना पाठींबा दिला आहे. अनेकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे.

‘दादा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या देशात मुस्कटदाबी सुरू आहे. अजून लय दिसं नाय चालायचं खेळ. लवकरच खल्लास होईल. काम बंद करतील, आवाज नाही,’अशी प्रतिक्रिया भीमराव धुलप नावाच्या युजरने दिली आहे. ‘काळजी करू नका. कोणतीही वेळ कायमस्वरूपी राहत नाही आणि सूर्याला कुणी झाकू शकत नाही. पण एक कळले काही चॅनल हे मनुवादी आणि दबलेले आहेत, ‘अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे केली आहे.

Team Global News Marathi: