राजकीय पुढाऱ्यांना लॉकडाऊनचे नियम लागू नाहीत का? केदार शिंदे यांचा रोखठोक सवाल !

दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या रोखठोख भूमिकामुळे तसेच वक्तव्यामुळे अनेकांना परिचित आहेत. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आव्हान केलेले असताना राजकीय पुढाऱ्याच्या मागे फिरणाऱ्या जमावड्यावर दिग्दर्शक केदार शिंदे याने भाष्य करत थेट पुढाऱ्यांनाच टोला लगावला आहे. या संदर्भात त्याने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

यात तो म्हणतो, ‘टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!’ अशी टीका त्यांनी सर्व पक्षीय राजकीय पुढाराऱ्यांवर केली आहे. यापूर्वीही दिग्दर्शक केदार शिंदेने ट्विटरवर एक ट्विट केले होतं. त्यांच्या या ट्विटनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

विष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…, असं ट्विट करत केदार शिंदेंनी प्रशासनावर टीका होती. केदार यांच्या ट्विटचे काहींनी समर्थन केले आहे तर, काहींनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युझर्सने नकारात्मक कमेंट देऊन त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Team Global News Marathi: