“पोलिसांच्या नावची बदनामी करून आदित्यसाहेब रिकामचोट रणछोडदास बनू नका” – अब्दुल सत्तार

 

मंत्री अब्दुल सत्तार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात मागील काही दिवसांपासून कोरडार वाद सुरु आहे. काही दिवसापूर्वी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू, दुसरा पप्पू म्हणून उल्लेख करण्यात आला होता तर आता सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र यावेळी सत्तार यांनी टीका करताना आदित्य ठाकरे यांचा उल्लेख रणछोडदास म्हणून उल्लेख केला आहे. उस्मानाबादमध्ये ते बोलत होते.

सिल्लोड येथे आदित्य ठाकरे यांची होणाऱ्या सभेवर बोलतांना सत्तार यांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, सिल्लोड येथील सभेला परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांची होत असलेल्या सभेचे ठिकाण सोडून इतर कोणत्याही ठिकाणी सभा घेण्यासाठी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना परवानगी दिली आहे. आमची सभा असलेल्या ठिकाणपासून ते पंधरा फुटावर परवानगी मागत आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळे उगाच पोलिसांच्या नावची बदनामी करून रीकामचोट रणछोडदास बनू नका असा टोला सत्तार यांनी लगावला आहे.

सत्तार यांनी पुढे म्हटले, आदित्य ठाकरे यांना ज्या ठिकाणी सभा घायची आहे त्या ठिकाणी गरज पडल्यास स्टेज उपलब्ध करून देतो. मंडप नसेल तर मंडप देतो, माईक नसेल तर तेही देतो परंतु सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घ्यावी असे सत्तार म्हणाले. तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांना चॅलेंज करतात, मात्र मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारा माणूस त्यांच्या मुलासमोर लढू शकत नसेल तर त्याला रणछोडदास म्हणावे लागले, असेही सत्तार म्हणाले.

 

Team Global News Marathi: