पोलिसांनी नितेश राणे यांना रत्नागिरीमध्ये जाण्यापासून रोखले

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथका मध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम यांनी तक्रार दिली होती.

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी त्यासंदर्भात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातच आता पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना रत्नागिरीत जाण्यापासून रोखले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

 

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्विटरवर व्हिडीओ ट्वीट करत दिली आहे. त्यांनी यावेळी पोलिसांकडे कोणताही लेखी आदेश नसल्याची तक्रार केली असून राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलिसांकडून मला मारण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे. रत्नागिरीच्या दिशेने मी माझ्या पद्धतीने जात होतो. मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी रत्नागिरीला जायला पोलीस देत नाही. यांच्याकडे कुठल्याही लेखी पद्धतीचा आदेश नाही. पोलीस खात्यामार्फत सामान्य नागरिकांना थांबवण्याचे काम केले जात आहे. हे संबधित पोलीस मला मारण्याची भाषा करत आहेत, याची दखल आपण घ्यावी असे त्यांनी व्हिडिओत म्हंटले आहे.

Team Global News Marathi: