आमच्या देवावर हात उचलण्याची भाषा युवासैनिक सहन करणार नाही, वरुण सरदेसाई आक्रमक

 

 

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद अधिक वाढलेले दिसून येत आहे. राणे सर्मथक आणि शिवसेना यांच्यात चांगलाच राडा होताना दिसत आहे. दरम्यान, या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तसेच शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत.

त्यातच राणे यांनी आव्हान दिल्यानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या सैनिकांनी नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी धडक दिली असून, येथेही युवासेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राणे कुटुंबीयांना थेट इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आमच्या देवावर हात उगारण्याची भाषा कुणी करत असेल तर ते युवासैनिक सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही शेकडो लाठ्या खाण्यास तयार आहोत.

यावेळी वरुण सरदेसाई यांनी नितेश राणेंनी दिलेल्या आव्हानाचाही समावेश दिला. येथे आम्ही आलो नाही. तर आम्हाला आव्हान दिले गेले होते. सिंहाच्या गुहेत येऊन दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले होते. मात्र आम्ही सिंहाच्या गुहेसमोर नाही तर उंदराच्या बिळासमोर आलो आहोत, असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: