मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. मागच्या कधी दिवसांपासून पूजा चव्हाण, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन अशा विविध प्रश्नांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
मागच्या काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. विधानसभेत याचे पडसाद उमटले आणि मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. यावरून विरोधकांनी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचे बोलले जात आहे.