मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होत असल्याचे चिरा दिसून आले आहे. त्यातच राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस झाला अन् त्यानंतर विधानपरिषदेचा निकाला जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरच्या एका सभेत बोलताना त्यांचा तोल ढासळल्याचं पहायला मिळालं आहे. शरद पवार हे मृत्यूंजय आहेत ते अनेकांच्या अत्यंयात्रेला जातात. येत्या काही दिवसांमध्ये गुजरातला सुद्धा जाऊन येतील, असं वादग्रस्त वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
शरद पवार यांची स्तुती करण्याच्या नादात अमोल मिटकरी यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सध्या मिटकरींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार हे स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम आहेत. सर्वजण त्यांच्या तब्येतीची काळजी करू नका, असंही मिटकरी म्हणले आहेत.