पंतप्रधानांनी मेट्रोचे तिकीट काढले आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा

 

पुणे | : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले. यानंतर पंतप्रधानांनी स्वतः मेट्रोचं तिकीट काढत प्रवास केला. यावरच बोलताना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आज पुण्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आज या मेट्रोचं पाहिलं तिकीट स्वतः पंतप्रधानांनी मोबाईलद्वारे पेमेंट करून काढलं आणि त्यात प्रवास केला, असं फडणवीस म्हणाले आहेत. पंतप्रधानांनी स्वतः तिकीट काढून यात्री केली असताना आम्ही विनातिकीट यात्रा केल्याने संकोच वाटत असल्याचंही ते म्हणाले. विनातिकीट प्रवास केल्याने मेट्रो प्रशासनाने नंतर आमच्याकडूनही पैसे वसूल करून घ्यावे असंही फडणवीस म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

Team Global News Marathi: