नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधासाठी सामाजिक माध्यमांवर ‘गो बॅक मोदी’ मोदीं’चा ट्रेंड

 

पुणे | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. या पुणे दौऱ्यात मोदी शहरातील काही विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिका भवनातील छत्रपती शिवाजी महराजांच्या मूर्तीचे अनावरण देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे .

मात्र नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याला भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. तसेच सामाजिक माध्यमांवर सुद्धा नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब. आंबेडकर पुतळ्याजवळ मोदी यांच्या पुणे दौऱ्या विरोधात आंदोलन केले आहे. तर काँग्रेसने शहरातील खंडूजी बाबा चौकात आंदोलन केले आहे.

पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने शहरात बऱ्याच ठिकाणी गो बॅक मोदी असा मजकूर असलेले काळे फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाच दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाल्यावर सामाजिक माध्यमांवर गो बॅक मोदी असा ट्रेंड चावलण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजे पर्यंत गो बॅक मोदी हा ट्रेंड चालवण्यात आला आहे.

Team Global News Marathi: