पंतप्रधानांना २ तासही झोपू द्यायचे नाही, हे ‘या’ नेत्यांनी ठरवलंय – संजय राऊत

 

नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आले आहेत. नागपुरात आल्यावर त्यांनी पहिल्यांदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचया विधानावर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ तास काम करतात, दोन तास झोपतात, आता तर ते दोन तासही झोप येऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. यावर बोलताना राऊत म्हणालेत की, मोदी साहेब खूप काम करतात, ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असा बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले आहे, त्यानुसार भाजपाचे नेते कामाला लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेचं लक्ष विदर्भ, मराठवाड्याच्या बांधणीवर राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचा विस्तार कोकण व्यतिरिक्त भागात झाला नाही, ही टीका होत असताना आता शिवसेनेनं पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर, शिवसेनेचे सर्व खासदार आता पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढणार आहेत. नागपूर या उपराजधानीच्या शहरात संजय राऊत यांच्यासह काही ज्येष्ठ मंडळी तळ ठोकून राहणार आहेत.

Team Global News Marathi: