पोळ्याच्या दिवशी बळीराजाची सरकारवर बोचरी टीका

 

पैठणमधील बैलपोळ्याच्या सणाला बैलाच्या पाठीवर वाक्य लिहून शिंदे सरकारवर बोचरी टीका करण्यात आली.त्यामुळे ही बैल जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. पोळ्याच्या सणाला बळीराजा आपल्या बैलांना छान सजवतो. सर्वात आकर्षक आणि चांगली बैलजोडी आपली दिसावी यासाठी तो प्रयत्न करतो. परंतु, सरकारवरील टीकेने ही बैल जोडी चर्चेचा विषय ठरली आहे.

पैठणमध्ये बळीराजा आपल्या बैलांना वेगवेगळ्या प्रकारे सजवत असतो. सर्वात आकर्षक आणि चांगली बैलजोडी आपली दिसावी यासाठी तो प्रयत्न करतो. मात्र, पैठण तालुक्यातील पाटेगाव या गावातील एक बैल चांगला चर्चेत आला आहे. कारण बैलाच्या पाठीवर चक्क पन्नास खोके एकदम ओके, असे वाक्य लिहिलेले होते.

बैलाने वेधले लक्ष पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या सर्वत्र प्रिय असलेल्या बैलांना साजशृंगार करतो. यात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सजवले जाते. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचे पडसाद अधिवेशनात दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेला संघर्ष सर्वांनीच पहिला.

मात्र, या संघर्षाचे पडसाद गावागावात दिसून आले.शिवसेनेशी एकनिष्ठ ग्रामीण मतदारांची खोचक टीका शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या ग्रामीण मतदारांनी बळीराजाची पोळ्याच्या दिवशी खोचक टीका करणारे वाक्य बैलाच्या अंगावर लिहीत टीका केली.

Team Global News Marathi: