BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, इतके हजार कोटी तिजोरीत जमा होणार

 

देशातील रिलायन्स, जिओ, एअरटेलसह खासगी दूरसंचार ऑपरेटर ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे देशातील सरकारी दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएल अद्याप ग्राहकांना ४जी सेवाही देऊ शकलेली नाही. त्यातच आता केंद्र सरकार २०२५पर्यंत बीएसएनएलचे तब्बल १३,५६७ मोबाईल टॉवर विकण्यास काढले आहेत. त्यामुळे सरकारला ४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

देशात ५जी सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून ५जीसाठी यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे. असे असताना बीएसएनएलचे टॉवर विकण्याच्या वृत्तामुळे नाराजी व्यक्त होत आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल टॉवरच्या विक्रीसाठी केपीएमजीला सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. यानंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने बीएसएनएलचे टॉवर विकणार आहे.

बीएसएनएलला आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज होते. त्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ६२ हजार कर्मचायांना सूचना केल्या होत्या. कर्मचायांनी सरकारी वृत्ती सोडून कर्मचायांना नीट काम करण्यास त्यांनी सांगितले. यासोबतच सरकारीवृत्ती सोडा आणि नीट काम करा, नाही तर घरी बसा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: