प्लीज मिटा दे यार! माजी क्रिकेटर रवी शास्त्रींची तरुणाला विनंती

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विटरवर पार्टी करत असतानाचे फोटो टाकले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी झगरीमगरी कपडे घातले असून ते ट्विटरवर चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या त्यांच्या ट्विटवर मोठ्या प्रमाणात कमेंटचा वर्षाव होत आहे.

शास्त्री यांनी केलेल्या 3-4 ट्विट पैकी एका ट्विमध्ये त्यांनी #AskRavi हॅशटॅग वापरत म्हटलंय की ‘मी आज चांगल्या मूडमध्ये आहे, मला जे विचारायचंय ते विचारा’ यावर भयंकरबत्रा नावाच्या ट्विटरहँडलवरून त्याला एक प्रतिक्रिया देण्यात आली. मनन बात्रा असं नाव असलेल्या या हँडलवरून शास्त्री यांचं पेनाने बनविलेलं चित्र पोस्ट करण्यात आलं होतं.

मी 2 तास खपून हे चित्र काढलं आहे , कृपया प्रतिक्रिया द्या असं मनन बत्रा याने ट्विटरवर विचारलं होतं. यावर रवी शास्त्री यांनी त्याला प्रतिक्रिया देत म्हटलं प्लीज मिटा दे यार. रवी शास्त्री यांचं चित्र असल्याचं सांगत जे चित्र या तरुणाने रेखाटलंय ते नेमकं कोणाचं आहे हे सांगणं फार अवघड आहे. आपलं इतकं वाईट चित्र काढलेलं शास्त्री यांना फार आवडलं नसावं यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे हे चित्र तू हटव अशी विनंती केली.

Team Global News Marathi: