झाडे लावा व तापमान कमी करा अन्यथा भविष्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागेल – पंजाबराव डख पाटलांचा इशारा

झाडे लावा व तापमान कमी करा अन्यथा भविष्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागेल -हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटलांचा इशारा

मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने जागर कृषी तंत्रज्ञान आणि हवामानाचा परिसंवाद संपन्न

बार्शी: सध्या झाडांची संख्या कमी असल्याने तापमान अन सिमेंटची जंगले वाढली आहेत. त्यामुळे जास्त पाऊस पडत आहे. भविष्यात महिलांना पाण्यासाठी हंडा घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. झाडे लावा व तापमान कमी करा अन्यथा भविष्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागेल असा इशारा हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी दिला.

ते मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित जागर कृषी तंत्रज्ञान आणि हवामानाचा या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ शेतकरी राजाभाऊ देशमुख हे होते. यावेळी व्हीएसआय चे माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, ज्येष्ठ बागायतदार लालासाहेब गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, प्रतिष्ठान चे अधिक संतोष ठोंबरे, सचिव प्रताप जगदाळे, शेतकरी विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.

डख पाटील म्हणाले की, यंदा बार्शी व आजूबाजूला खूप पाऊस पडणार आहे.आता तो उघडेल. सप्टेंबर पर्यत पाऊस नसणार आहे. या पाच सहा दिवसात कामाचे नियोजन करा.निसर्ग शेतकऱ्यांच्या हातात नाही. शेती हा आपला कणा आहे.आपल्याकडे 50 टक्के कोरडवाहू तर 30 टक्के बागायती शेती आहे 1996 ते 2001 मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड झाली.त्यामुळे तापमान वाढू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून सध्या जास्तीचा पाऊस पडत आहे.झाडे जास्त तितका रिमझिम पाऊस पडतो. निसर्ग शेतकऱ्यांना जगू देत नाही पण निसर्गला घाबरू नका.मी दररोज अंदाज देणार आहे. त्या नुसार नियोजन करा नुकसान होणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले.

विश्रांती नंतर सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस पडणार आहे.2 ते 10 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा व विदर्भ आणि सोलापूर मध्ये 24 ऑक्टोबर दरम्यान पाऊस अन थंडी असणार. आपल्याकडे येणारा पाऊस हा पूर्वेकडून येतो त्यामुळे सोलापूर मध्ये जास्त पाऊस पडतो.

पाऊस कुठून अन कसा येतो हे सांगताना डख म्हणाले की
22 मे अंदमान वरून निघतो पुढे श्रीलंका, केरळ, गोवा, मुंबई आणि पुन्हा राज्यात सर्वत्र व्यापतो.पाऊस पूर्वेकडून आला म्हणून यंदा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

आबासाहेब साळुंखे म्हणाले की, पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माती ही महत्वाची. तसेच सेंद्रीय कर्बही महत्त्वाचे आहे. त्यासाठी माती समजून घ्या. मनाशी खुणगाठ बांधा की आपण सजीवांशी खेळत आहोत असे सांगत ऊसशेती उद्योग, ऊस पिकासाठी मशागतीची तयारी, माती परीक्षणाचे महत्त्व, ऊस लागवडीच्या पद्धती, लागवडींचा हंगाम, आंतरपिके, रासायनिक खतमात्रा, ऊसपिकासाठी अन्नघटकांचे महत्त्व, पाणी व्यवस्थापन, उसातील कीड व रोगांची ओळख, पाण्याची कमतरता, परिणाम, शाश्‍वत ऊस उत्पादनाचे महत्त्वाचे घटक आणि उसाची पक्वता तसेच तोडणी या विषयावर साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

लालासाहेब तांबडे म्हणाले ,सध्या आरोग्य अन मानसिक समस्या तसेच तणाव वाढू लागला आहे. आहार सकस नसल्याने हे प्रमाण वाढले आहे. संवाद कमी झाला आहे.त्यामुळे रसायनमुक्त शेती काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.प्रस्ताविकात सयाजीराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी हा खटाटोप केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अपर्णा दळवी व गणेश शिंदे यांनी केले तर आभार किरण गाढवे यांनी मानले.

चौकट

यावेळी कृषी आणि कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माणिक पाटील, भानसळे. वर्षा रगडे, उपळाई (ठों), बार्शी., समिनाताई मुलाणी, सुर्डी.शोभा पवार, कुसळंब. सुदर्शन सुतार, सोलापूर.प्रमोद पाटील, बार्शी,
लक्ष्मणराव जाधव, ढाळेपिंपळगाव. संतोष काटमोरे, साकत पिंपरी,रेश्मा राऊत, बार्शी,भाग्यश्री लोंढे, जहानपूर. कविता मुंढे, कळंबवाडी (आ.) वैशाली आवारे, सासुरे. यांचा मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: