‘मी पृथ्वी कन्या’ म्हणणाऱ्या सचिन पिळगावकरच्या मुलीचे फोटो होतायत तुफान वायरल!

मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. महत्वाचे म्हणजे श्रिया सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक असून सुद्धा, तिने आपल्या स्वहिमतीवर चित्रपटसृष्टीत नाव कमविले आहे.

नुकतेच श्रियाने स्वतः चे एक फोटोशूट इंस्टाग्रामवरच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती नदीच्या कडेला बसलेली दिसत आहे. तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर तिने पारंपरिक लुक केला आहे. विशेष म्हणजे तिच्या नाकातील नथ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत या लुकमध्ये श्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.एकंदरीत या लुकमध्ये श्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.

हा फोटो पोस्ट करत श्रियाने, ‘पृथ्वीची मुलगी’ असे कॅप्शन दिले आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

श्रिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत अशा पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर करत राहते. तसेच ती आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल शेअर करून, ती अपडेट देत राहते.

दरम्यान, श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Team Global: