फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल

 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा पत्रकार परिषेद घेऊन ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप लगावले होते. , आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ महाविकास आघाडी सरकारचा बदलीचा महाघोटाळाबाबत आहे. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. एका पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होतें.

फडवणीस म्हणाले की, आज 12 मार्च मुंबईत बॉबस्फोट झाला होता, त्यात शहीद झालेल्या लोकांना श्रध्दांजली अर्पण करतो. आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ माहविकास आघाडी सरकारचा बदली महाघोटाळाबाबत आहे. त्याची माहिती मी दिल्ली येथे होम सेक्रेटरी यांना दिली होती. त्यानंतर सीबीआय चौकशी सुरू झाली. यात अनिल देशमुख यांची चौकशी झाली. ते सध्या जेल मध्ये आहेत

राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि FIR दाखल केला, त्याबाबत मला एक प्रश्नावली पाठवली. मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळं माझी महिती कुठून आली हे विचारलं होतं. काल मला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आणि बीकेसी पोलीस येथे बोलावले आहे. मी जाणार आहे आणि योग्य ते उत्तर देणार आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सहा महिने हा अहवाल सरकारकडे पडला होता यात कुठलीही कारवाई झाली नाही. यात सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा काढला त्यांची चौकशी केली पाहिजे? मी पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. परंतु माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाही

Team Global News Marathi: