PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याचीया नेत्याने केली मागणी

 

हिंसाचार आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यांवरून केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घातली आहे. या बंदीचे स्वागत करताना विरोधकांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी संघावर बंदीची मागणी केली आहे. तर, लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद के. सुरेश यांनीदेखील पीएफआयआणि संघ एकसारखेच असून संघावर बंदीची मागणी केली आहे.

NIA ने दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे. पीएफआयकडून देशाच्या संविधानावर अविश्वास व्यक्त करण्यात येत असून त्यांना २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितला. देशातील विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारातही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले.

तसेच छुप्या अजेंड्यानुसार समाजातील एका वर्गाला कट्टरतावादाकडे वळवून लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत होते. देशाच्या संविधानाबद्दल या संघटनेचा अनादर दिसत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले की, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. संघावर आधीदेखील बंदी घालण्यात आली होती. पीएफआय, संघासारख्या इतर संघटनांवर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले

Team Global News Marathi: