जाणून घ्या आजचे राशिभविष्य – कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

जाणून घ्या आजचे राशिभविष्य – कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 September 2022
गुरुवार.
तारीख 29.09.2022
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल- दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- विशाखा.
चंद्र राशी- तुळ 23.24 पर्यंत नंतर वृश्चिक.
————————————–


मेष – शुभ रंग- मोरपंखी
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. आज तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल.

वृषभ- शुभ रंग- हिरवा
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. प्रमोशनच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. तुमच्या प्रयत्नांना आज दैव साथ देईल.

मिथुन- शुभ रंग- हिरवा
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष असणे आवश्यक.

कर्क- शुभ रंग- डाळिंबी – Today’s Horoscope 29 September 2022
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. घरात प्रसन्न वातावरण असेल.

सिंह -शुभ रंग- सोनेरी
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वणवण होईल. गृहिणींना शेजारधर्म पाळावेच लागतील. जवळपासच्या प्रवासात भविष्यकाळाच्या दृष्टीने काही फायदेशीर ओळखी होतील.

कन्या- शुभ रंग- पिस्ता
धनस्थानातील चंद्रभ्रमण घरात आर्थिक सुबत्ता आणेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा व नेतृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील.

तूळ- शुभ रंग- स्ट्रॉबेरी
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती चांगली असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. आज इतरांना दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक- शुभ रंग- निळा
आज तुम्ही थोडे हट्टी पणाने वागाल. घाई गर्दीत निर्णय घ्याल व ते चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज स्वतःवर संयम ठेवण्याची गरज आहे.

धनु- शुभ रंग- भगवा
आज हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल.

मकर- शुभ रंग- मरून
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनचे वेध लागतील. आज स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल.

कुंभ- शुभ रंग- राखाडी
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती आध्यात्मिक होतील.

मीन- शुभ रंग – आकाशी
जे चाललंय ते बर चाललंय. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो. आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: