मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केली होती. या घोषणेनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दुजोरा दिला. मात्र अवघ्या काही तासातच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत लस देण्याच्या निर्णयाचे ट्विट डिलीट केले होते. याच मुद्द्यावरून आता भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनिमंत्रि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी राजचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांची डिलीट ट्विटवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.