सहकार क्षेत्र संपवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा घाट – जयंत पाटील

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकार सहकार क्षेत्र संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं आणि मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणं चुकीचं आहे.

तसेच रिझर्व्ह बॅंकेचं हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करत, अशा शब्दात पाटील यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्याचप्रमाणे सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘आता तुम्हीच समजून जा’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे .

खाजगी बॅंका सामान्य लोकांना दारात उभ्या करत नव्हत्या, असं लक्षात आल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले. सहकार म्हणजे सामान्य लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली शक्ती. त्या शक्तीतून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. परंतु भाजपला महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबांशिवाय कुणी काही काम केले नाही पाहिजे, अशी भावना भाजपची असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे आता या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: