शेतकरी आंदोलन पुर्नजीवित करण्यासाठी पैसा आणि दारू पुरावा, काँग्रेसच्या या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहे. मात्र त्यात विरोधक आणि सत्ताधारी बेलगाम वक्तव्य करत त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विद्या देवी असे या महिला काँग्रेस नेत्याचे नाव आहे.

विद्या देवी म्हणतात की, केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन पुनर्जीवित करण्यासाठी पैसा आणि दारु पुरवा असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. हरयाणातील जींदमध्ये त्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या.

शेतकरी आंदोलन सुरु ठेवण्यासाठी पैसा, भाज्या,तूप आणि दारू पुरावा असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. या बैठकीला साफीदोनचे काँग्रेस आमदार सुभाष गांगोली उपस्थित होते. बैठकीच्या कार्यक्रमाचे मीडियाकडून रेकॉर्डिग सुरु असल्याचे जेव्हा काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी विद्या देवी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण विद्या देवी यांनी आपले भाषण सुरुच ठेवले.

दारु का पुरवली पाहिजे? त्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. “आंदोलनाकडे प्रत्येक प्रकारची लोक आकर्षित होतात. त्यांना वेगवेगळया प्रकारच्या सुविधा हव्या असतात. आपल्याला वेगळया पद्धतीने आंदोलनाला बळकट करायचे आहे” असे विद्या देवी म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जींदमध्ये त्यांनी रॅलीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला दिशा आणि नवीन जीवन मिळेल.

Team Global News Marathi: