राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज १८ जुलै रोजी पार पडत आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु काल उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा काल विरोधकांनी केली. तर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राणे बंधूंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना सावधानतेचा इशारा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या बैठकीचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले आहे.
या फोटोत सर्व नेते शरद पवारांच्या घरातील हॉलमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. परंतु या बैठकीला संजय राऊतांनी देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे हा फोटो ट्विट करत भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून मॅच हरल्यानंतर प्लेयर ड्रेसिंग रूममध्ये अशी कॅप्शन देत विरोधी पक्षांच्या बैठकीतला फोटो ट्विट केला आहे. आता या टीकेला शिवसेना काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.
मॅच हरलेल्या नंतर प्लेयर ड्रेसिंग रूम. pic.twitter.com/fN2qJtw3fT
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 17, 2022