“पवारांची संस्कृती, संस्कार शिकला तर महाराष्ट्र आणखी मातीत जाईल”

 

भाजपा नेते गोपीचंद पडळकर सतत रास्तवराडी आणि पवार कुटुंबियांवर टीका करताना दिसून आले होते मागच्या काही दिवसांपासून पडळकर आणि राष्ट्रवादी असा वाद अख्या महाराष्ट्राने पहिला आहे अशातच आता पुन्हा एकदा पाडळकरांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्यांना इशारा दिला आहे. यातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष एका तरुणीचे लैंगिक शोषण करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होतो.

या महाशयांना तुम्ही सगळे सोबत घेऊन विमानात आणि हेलिकॉप्टरमधून फिरताय, यावर तुम्ही भाष्य करत नाही. पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत. राणा दाम्पत्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यांना १४ दिवस कोठडीत टाकलं. त्या महिला नाहीत का? अशी विचारणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे सांगातहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. मग हे कुठले संस्कार आहेत. का त्यांनी बोलले की माफ. त्या मोठ्या घरातल्या आहेत, पवारांच्या कन्या आहेत म्हणून माफ. तुम्ही या राज्यात महिलांशी किती चुकीचे वागलात, असे म्हणत पडळकरांनी पवार घराण्यावर निशाणा साधला.

Team Global News Marathi: