भाजपाच्या उपटसुंभांचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का?

 

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे झालेले नसल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं होतं. त्यावर आज रोहित पवार यांनी शेकल्या शब्दांत दरेकरांनाच सवाल विचारला आहे.

“पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोहित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?”, असा खरमरीत सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी दरेकरांना उत्तर दिलं आहे.

 

Team Global News Marathi: