पवार साहेबांनी पक्षातील वादाने त्रागा करून राजीनामा दिला आहे का? हे देखील पहावं लागेल

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. तर दुसरीकडे शरद पवारांनी आपलं निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहे तर दुसरीकडे पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिकीर्या उमटणं दिसून येत आहे अशातच आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीमधील राजकीय वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांनी निर्णय घेतला, पण कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मग कोण जबाबदारी घेणार हे देखील पहावं लागेल. राजीनाम्याचा अजून अंतिम अध्याय लिहिलेला नाही. पवार साहेबांनी राजीनामा दिला, तर सुप्रियाताई, अजित पवार असे अनेक पर्याय आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळणारा नेता हा खासदार असावा लागतो. त्यामुळे सुप्रियाताई यांच्याच नावाचा विचार होऊ शकतो.

चव्हाण पुढे म्हणाले की, पवार साहेब यांनी पक्षातील वादामुळे त्रागा करून राजीनामा दिला आहे का? हे देखील पहावं लागेल. शरद पवार यांना कुणी शिल्पकार म्हटलं कुणी काय म्हटलं पण काँग्रेस आल्याशिवाय ही महाविकास आघाडी होऊ शकली नसती. महाविकास आघाडीला फोडल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. म्हणून भाजपकडून काही प्रयत्न सुरू आहेत, पण आम्ही तिन्ही पक्ष भाजप विरोधात भूमिका घेऊन एकत्र आलो आहोत. तिन्ही पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले.

Team Global News Marathi: