नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास १ तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे.
आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट झाली आहे. या भेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘ही भेट नॉर्मल, तरी काही घडलं असेल तर माहिती नाही अशी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती.
तसेच यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ती बंधनं कमी करण्यासाठी शरद पवार दिल्ली मोदींच्या भेटीला गेले आहेत. पवार यांना बँकिंग क्षेत्रातील लोकांनी निवेदन पाठवली आहे. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची भेट झाल्याचं पाटील म्हणाले.