पवार-बृजभूषण फोटोचा राजकीय संबंध नाही! मनसेच्या ट्विटवर वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

 

मनसेने ट्विट केलेल्या शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या फोटोवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत आणि बृजभूषण सिंह हे देखील त्यांच्या राज्यातील कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे ह्या डोही नेत्यांमध्ये ओळख असणे साहजिक आहे.

तसेच ट्विट करणारी आलेला फोटो जुन्या काळात महाराष्ट्रात एका कुस्तीच्या कार्यक्रमातील तो दिसतोय. मागील पोस्टरवरून तो फोटो कुस्तीच्या कार्यक्रमातील असल्याचे स्पष्ट होतेय. त्यामुळे त्याचा आणि याचा राजकीय संबंध लावायचे कारण नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मनसेचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. या दरम्यान मनसे नेत्यांकडून काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार, आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसताहेत. फोटोच्या मागे लावण्यात आलेल्या पोस्टवर ‘सन्मान लाल मातीचा… बहुमान मावळ वासियांचा’ असे लिहिलेले आहे. हा कुस्तीचा कार्यक्रम असून या फोटोचा राजकीय संबंध नसल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: