‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हार्दिक आणि अक्षराबरोबर ‘हे’ सेलिब्रिटी कपल लावणार हजेरी

 

मुंबई | झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

सध्या सुरु असलेल्या लग्नसराई मध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली आणि काही कलाकारांचा साखरपुडा देखील झाला. त्यातील सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर सज्ज होणार आहेत.

त्याचसोबत त्यांच्या उपस्थित चला हवा येऊ द्या मधील विनोदवीरांनी मात्र कल्ला केला. विराजास, शिवानी, हार्दिक आणि अक्षया सोबत अंशुमन विचारे त्यांच्या सौ आणि त्यांची चिमुकली देखील हजर असणार आहेत. काही व्दिसांपूर्वी हार्दिक जोशी आणि अक्षर दवधार यांचा साखरपुढा मुंबईत पार पडला होता त्यांच्या या आनंदच्या उत्सवावर चाहत्यांनी शुभेच्छाच वर्षाव केला होता.

Team Global News Marathi: