‘धीर तरी कसा देऊ’; पूरग्रस्तांच्या भेटी घेताना शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर !

 

रत्नागिरी | पश्चिम महाराष्ट्र कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर येऊन अनेकांचा संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये जात पाहणी केली.

सर्व पाहणी केल्यावर त्यांना अक्षरक्ष: रडू कोसळलं. ज्या कुटूंबापर्यंत कोणी पोहोचलं त्या कुटुंबाची भेट घेत त्यांनी त्या कुटुंबाला रोख रक्कम देत मदत केली. सध्याची स्थिती पाहता कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. हे घर आतमध्ये आहे, कशी मदत पोहोचणार माहित नाही. परमेश्वराने त्यांना वाचवलं आहे तर नक्की पुढची मदत होईल, असं मातोंडकर म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, मी नेता नाही पण आश्वासन दिलं असून ते मी माझ्या परीन पुर्ण करेल. अजून काय करू?, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर झाले. ही घटना घडली तेव्हा आपण कोलकातामध्ये असल्याचं उर्मिला मातोंंडकर म्हणाल्या. महाप्रलयाची स्थिती पाहून मी दु:खी झाले आणि त्यावेळी ठरवलं की कोकणवासियांना मदत करायची. कोणी तरी पुढाकार घेत मदत करणं गरजेचं होतं आणि तिच मदत घेऊन मी आल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं होत.

Team Global News Marathi: