भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर, या नेत्याने लगावला टोला

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चेबंदी सुरु केली आहे तर भाजपाला सत्तेततून काही उतरवण्यासाठी काँग्रेस, बसपा आणि समाजवादी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपने यावेळी देखील पुन्हा खुर्ची मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपला हरविण्यासाठी राज्यातील काही पक्ष एकत्र येत ही निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

राजभर वाराणसी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते जर मत मागायला आले तर त्यांना दोन पायावर पाठवू नका, असं राजभर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राजभर म्हणाले की, आता निवडणुका आल्या आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते मंडळी मत मागण्यासाठी येतील. ते आले तरी त्यांना दोन पायावर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर. असे विधान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: