रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क फडणवीसांची ‘टरबूज्या’ म्हणत उडवली खिल्ली !

 

 

 

 

   नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन तसेच प्रवीण दरेकर तसेच इतर भाजपा नेत्यांनी काल नाशिक दौरा केला होता. यावेळी नाशिकमध्ये एका रुग्णालयात गेले असता फडणवीसांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या पाहणी केली होती.

देवेंद्र फडणवीस रुग्णालयात येताच काहींनी ‘टरबुज्या’ असे हिणवत त्यांची खिल्ली उडवली होती. या दरम्यान, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना एका रुग्णाच्या नातेवाईकांने फैलावर घेतले होते. रुग्णाच्या नातेवाईकाचा संताप बघून फडणवीस आणि इतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी तिथून कडधात पाय घेतला होता. याच दौऱ्यात रुग्णांनी बिटको हॉस्पिटलमधील अव्यवस्थेचा पाढा देखील फडणवीस यांच्यासमोर वाचला.

एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना नेत्यांनी अशा प्रकारची गर्दी जमवणे योग्य आहे का? असा खडा सवाल रूग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला.तसेच,अनेकांनी “तुम्ही येथून माघारी जा” असेही नारे दिले.याच दरम्यान,महाजन आणि नागरिकांमध्ये चांगलीच खंडाजंगी झालेली देखील पाहण्यास मिळाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

Team Global News Marathi: