राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा रविवार तुमच्यासाठी

रविवार 2 मे रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार…

मेष : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. काही पेचप्रसंग यशस्वीरीत्या सोडवाल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : २
काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा आज पूर्ण होतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी वसूल होतील.

सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
पारिवारीक सुखात वृद्धीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

कन्या : शुभ रंग : मरून | अंक : ९
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. घाईगर्दीत आज काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

मकर : शुभ रंग : लाल | अंक : १
काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. वाणीत मृदुता असावी.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : २
आज उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: