कोरोनाच्या संकटात दिवस-रात्र रुग्णाची सेवा करणाऱ्या ‘या’ आमदाराची आता देश-विदेशात चर्चा

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्ण संख्यात झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील एका आमदाराची आता देश-विदेशात चर्चा सुरु झालेली आहे. त्या राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव आहे निलेश लंके. जर माणसामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो काहीही करू शकतो हे आमदार निलेश लंके यांनी आपल्या कृतीतुन दाखवून दिले आहे.

आमदार निलेश लंके यांनी स्वतःकडे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना ११०० बेडचं कोविड सेंटर उभारलं आहे. मग काय लंके यांचे काम बघून परदेशी नागरिकांनाही त्यांनी भुरळ पडली आहे. लंके यांना एक नव्हे तर ५ देहसातील नागरिक आर्थिक मदत करत आहेत. लंके यांच्या कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशांमधून लोकांनी आर्थिक मदत आलेली आहे याची माहिती खुद्द लंके यांनी दिलेली आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खिशात एक रुपयाही नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची किमया केली आहे. सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले. त्यांच्यात लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती आहे. हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले आणि थेट आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, हे शक्य झालं त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी लोकांची माने जिंकली आहेत.

लंके यांचं काम पाहून अनेक रुग्णांच्या डोळ्यात अश्रू येतात. स्वतःचा मुलगा देखील इतकी सेवा करू शकत नाही इतकी सेवा निलेश लंके करत असल्याचं हे रुग्ण सांगतात. निलेश लंके हे आमची दिवसरात्र काळजी घेतात आहि भावना उपचार घेत असलेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Team Global News Marathi: