‘विधानसभा अध्यक्षाची निवड न केल्याने पक्षश्रेष्ठी नाराज’ या नेत्यांबाबत दर्शवली नाराजी |

 

दोन दिवसीय पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात यावेळी सुद्धा विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोलून दाखविले जात आहे, याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यावर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून दिल्लीतील पक्षनेतृत्व नाराज असल्याचे बोलून दाखविले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून नक्की काय झाले, त्याची माहिती द्या, अशी विचारणा काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आमदारांच्या मतदानावर विश्वास नव्हता तर, गुप्त मतदानाची अट बदलून नियम समितीत त्यात बदल घडवून आणता आला असता.

विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने राजिक्य वातावरण बिघडल्याचं दिसून येतं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली ती आधी का घेण्यात आली नाही? भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांचे निलंबन केल्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी का केली नाही? असे प्रश्नही संबंधित नेत्यांना विचारण्यात आले आहेत.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही, हे राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून श्रेष्ठींना कळवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे.

Team Global News Marathi: