परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !! पंकजा मुंडेच ट्विट

बीड : जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत बीड भाजपनं व्यक्त केलंय. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर या प्रकरणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत राज्याची मान खाली गेल्याची खंत व्यक्त केलीय.

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलंय. याद्वारे पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

दुसरीकडे करुणा शर्मांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे, तशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झालाय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आलीय. तसंच करुणा शर्मा यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

 

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: